ज्येष्ठ शिवसैनिक दिलीपराव राईकवार यांचे दुःखद निधन
कन्हान : - कन्हान शहरातील जे.एन. रोड, आंबेडकर चौक, विवेकानंद नगर, येथील रहिवासी तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक मा.दिलीपराव मारोतराव राईकवार यांचे रविवार, दि. ५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
गेल्या काही काळापासून ते अप्लास्टिक अॅनिमिया या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने कन्हान परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १२.०० वाजता त्यांच्या जे.एन. रोड, आंबेडकर चौक, विवेकानंद नगर, कन्हान येथील राहत्या घरातून निघून कामठी शांती घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राईकवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विविध राजकीय, सामाजिक व नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या