थोड्या पावसातच नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठी अडचण
सावनेर भागेमहारी: सावनेर तालुक्यातील नरसाळा आणि भागेमहारी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर थोड्या पावसातच पूर आला. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून, शालेय विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरून पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना वाट पाहावी लागत आहे.
थोड्याशा पावसामुळेच नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावर पाणी येते आणि रस्ता बंद होतो, असे गावातील नागरिकांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचता येत नाही आणि शेतीची कामे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही अडचणी येतात.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या पुलाची मागणी केली आहे. या भागातील ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन, लवकरच मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुढाकार प्रतिनिधी अशोक काळबांडे
0 टिप्पण्या