Advertisement

आमदार अड. आशिष जयस्वाल यांचा प्राचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | MLA Adv. Citizens' spontaneous response to Ashish Jaiswal's public meeting


आमदार  आशिष जयस्वाल यांचा प्राचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | MLA Adv. Citizens' spontaneous response to Ashish Jaiswal's public meeting

रामटेक मतदारसंघातील मायबाप जनता विकासाला प्राधान्य देईल - आमदार अड.आशिष जयस्वाल 

विकास हीच माझी जात , धर्म आणि पक्ष आहे - आमदार अड.आशिष जयस्वाल 

"आशिष जयस्वाल अंगार है , बाकी सब भंगार है." अश्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले

कन्हान : - रामटेक विधानसभा निवडणुकीत महायुति चे उमेदवार अड.आशिष जयस्वाल यांचा कन्हान येथे झालेल्या प्राचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . कन्हान शहरातील सात नबर नाका पासुन कानपुर केमिकल मैदाना पर्यंत काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये महायुति चे पदाधिकारी व कार्यकर्ता मध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले . 


यावेळी "आशिष जयस्वाल अंगार है , बाकी सब भंगार है." अशा प्रकारचे जयघोष पदाधिकार्यांनी केले . आशिष जयस्वाल यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने रामटेक विधानसभा निवडणुक चांगलीच रंगली असुन रामटेक मतदारसंघातील मायबाप जनता विकासाला प्राधान्य देईल असा विश्वास आमदार अड.आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे .

शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या वतीने (दि.२८) आॅक्टोंबर ला रामटेक विधानसभा मतदारसंघातून आमदार आशिष जयस्वाल यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या रामटेक विधानसभा क्षेत्रातील विकासाचं पुढचं पाऊल आपल्या सर्वांच्या साथीने टाकले होते . 


यावेळी भव्य रैलीच्या माध्यमातून रामटेक मतदार संघातील माय-बाप जनतेने हजारो पेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . आमदार आशिष जयस्वाल यांनी अर्ज दाखल केल्या नंतर रामटेक विधानसभा मतदार संघातील अनेक गावात दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला . यावेऴी नागरिकांनी ठिकठिकाणी आशिष जयस्वाल यांचे आरती ओवाळुन , फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत केले प्रचार सभेच्या माध्यमातुन राज्य शासनाने केलेल्या विकास कामाची , विविध योजनेची माहिती दिली . 

गेल्या २० वर्षांपासून रामटेक विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतांना हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रामाणिक काम केले असे आमदार आशिष जयस्वाल यांनी मतदारांना संबोधित केले . विकासाला कोणत्याही मर्यादा नसतात. विकास हीच माझी जात , विकास हाच माझा धर्म आणि विकास हाच माझा पक्ष आहे.


 गेल्या २० वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे . यंदा देखील रामटेक मतदारसंघातील मायबाप जनता विकासाला प्राधान्य देईल असा विश्वास आमदार अड.आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे . यावेळी शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सर्व जेष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या