Advertisement

रामटेक विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ७१.८० टक्के मतदान , उद्या ला मतमोजणी | Ramtek assembly constituency records highest voter turnout of 71.80 percent, counting of votes tomorrow


रामटेक विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ७१.८० टक्के मतदान , उद्या ला मतमोजणी

विकासाची वाट पाहणाऱ्या रामटेक विधानसभा क्षेत्रात परिवर्तन होणार ?

आशिष जयस्वाल आणि राजेंद्र मुळक यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता 

आशिष जयस्वाल गड कायम राखणार की राजेंद्र मुळक क्षेत्राचे आमदार होणार , मतदात्यांचे लक्ष

कन्हान : - रामटेक विधानसभा क्षेत्र मागील काही वर्षा पासुन विकासाची वाट पाहत आहे . क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाल्याने जन सामान्य नागरिक चिंतेत आला आहे . त्यामुळे या निवडणुकीत क्षेत्राला नवीन आमदार मिळावा असे जागृत मतदात्यांन कडुन बोलले जात आहे .

रामटेक मतदार संघात ३५९ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले . पुरुषांनी , तरुणांनी , तरुणींनी , महिलांनी , अपंग आणि वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावल्याने रामटेक विधानसभा मतदार संघात सर्वाधिक  ७१.८० टक्के मतदान झाले . निवडणुक शांत वातावरणात पार पाडण्याकरिता निवडणुक निर्णय अधिकारी प्रियेष महाजन यांचा मार्गदर्शनात प्रशासनाने जय्यत तयारी केली होती . उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .

विकासाची वाट पाहणाऱ्या रामटेक विधानसभा क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंन्द्रात औषधांची सुविधा नाही , मोठे हाॅस्पीटल नाही , स्वच्छता नाही , शाळा आणि काॅलेज च्या विद्यार्थांना बस उपलब्ध नाही , शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित , रस्ते  , नाली बांधकामात भष्ट्राचार , शासकीय कार्यालयात जन सामान्य नागरिकांचे काम होत नाही , पिण्याचा पाण्याची व्यवस्था नाही , बेरोजगार तरुणांना रोजगार नाही , फुटपाथ दुकानदारांना स्थाई जागी नाही , अवैध धंधे ,  गुंडागर्दी आणि गुन्हेगारी वर अंकुश नाही अश्या अनेक ज्वलंत समस्या विधानसभा क्षेत्रात निर्माण झाले आहेत . 

दोन दिवसा पुर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे  . उद्या शनिवारी सकाळी होणाऱ्या मतमोजणीनंतर १७ पैकी रामटेक विधानसभा मतदार संघातील आमदार निश्चित होणार आहे . शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲड.आशिष जैस्वाल आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.  आपापल्या उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत आहेत . आशिष जयस्वाल गड कायम राखणार की राजेंद्र मुळक क्षेत्राचे आमदार होणार या कडे मतदात्यांचे लक्ष लागले आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या