Advertisement

शाहिर कलाकरांना ५ हजार रुपये मिळुन देणारे राजेंद्र बावनकुळे निवडणुकी च्या रिंगणात | Rajendra Bawankule who gives 5 thousand rupees to Shahir artists in the arena of elections


शाहिर कलाकरांना ५ हजार रुपये मिळुन देणारे राजेंद्र बावनकुळे निवडणुकी च्या रिंगणात | Rajendra Bawankule who gives 5 thousand rupees to Shahir artists in the arena of elections


रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासा साठी सक्षम नेतृत्वाची गरज - राजेंद्र बावनकुळे


कन्हान : - शाहिर कलाकरांचा  बुलंद आवाज म्हणुन विदर्भात ओळखले जाणारे शा.राजेंद्र बावनकुळे रामटेक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहे . राजेंद्र बावनकुळे यांनी राज्य शासनाला पत्र व्यवहार , आंदोलन करुन शाहिर कलाकरांना ५ हजार रुपये मानधान मिळुन दिले . जन सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अधिकार्यांना निवेदन पत्र देऊन नागरिकांना न्याय मिळुन देण्यासाठी प्रयत्न करतात .


शाहिर कलाकरांना तुटपुंजे  २,२५० रुपये शासना कडुन मिळत असल्याने त्यांचा उदाहनिर्वाह होत नव्हता . अखेर भारतीय शाहिर मंडळ कामठी संस्थेचे अध्यक्ष शा.राजेंद्र बावनकुळे यांनी पाठपूरावा केला होता . परंतु राज्य शासन दुलर्क्ष करीत असल्याने अखेर (दि.१३) डिसेंबर रोजी भारतीय कलाकार शाहिर मंडळ ऑल इंडिया द्वारे भव्य शाहिर कलाकर मोर्चा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला वेठीस धरले होते . परंतु शासनाने शाहिर कलाकरांची मागण्या मंजुर न केल्याने राजेंद्र बावनकुळे यांनी परत (दि.१८) डिसेंबर रोजी पासुन साखळी उपोषण सुरु केले होते . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक यांना निवेदन दिल्याने शासनाने शाहिर कलाकरांची मागणी मंजुर केली. शा.राजेंद्र बावनकुळे यांचा सतत प्रयत्नाने शाहिर कलाकरांना ५ हजार रुपये मानधान मिळुन दिले . 

रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणार - राजेंद्र बावनकुळे


शाहिर कलाकरांना ५ हजार रुपये मानधान मिळुन दिल्या नंतर राजेंद्र बावनकुळे यांनी रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची इच्छा व्यक्त केली . क्षेत्रात आरोग्याचे प्रश्न , विद्यार्थांचे प्रश्न , जन सामान्य नागरिकांचे प्रश्न , शेतकऱ्यांचे प्रश्न मागील अनेक वर्षा पासुन रखडलेले असुन खासदार , आमदार सोडवण्यात अपयशी ठरले . नशेडी पदार्थांची विक्री , गुंडागर्दी , अवैध धंधे ची भरमार असुन क्षेत्र क्रिमिनल म्हणुन ओळखले जाते . रस्ते , नाली बांधकामात दिरंगाई , भष्ट्राचार होत असुन कारवाई नाही . कन्हान शहरातील डब्लुसीएल च्या ब्लाॅस्टिंग मुळे नागरिकांचे घर हादरणे , उद्योग धंधे नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन क्षेत्रात चोरी, घरफोडी चे प्रमाण वाढले आहे. तरुण मुल नशेच्या मार्गात जाऊन स्वताचे जीव धोक्यात घालत आहे. अशा अनेक समस्यांचा डोंगर क्षेत्रात असुन मोठे राजकीय पक्षाचे नेते आर्थिक लाभासाठी दुलर्क्ष करतात. निवडणूक आले की मतदारा  पर्यंत पोहचुन खोटे आश्वासन, प्रलोभने देऊन निवडुन येऊन समस्याचे समाधान करत नाही. रामटेक विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाची गरज असुन नागरिकांन मध्ये जन जागृति , तरुण मुलांना नशे पासुन मुक्त करणे, आदीवासी क्षेत्रात काम करून त्यांना न्याय मिळवून देणे, रोजगराचे साधन उपलब्ध करणे , मोठे हाॅस्पीटल उभारणे , शाळा काॅलेज मध्ये सोय सुविधा उपलब्ध करणे, लोका पर्यंत योजना पोहचविणे, उद्योग सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासा साठी सक्षम नेतृत्वाची गरज असुन शाहीर राजेंद्र बावनकुळे हा एकच पर्याय आहे. असे जागृत नागरिकांन कडुन बोलले जात असुन मतदारांनी शा.राजेंद्र बावनकुळे यांना निवडुन द्यावे असे आवाहन जागृत नागरिकांनी मतदरांना केले आहे .


कुवारा भिवसेन येथे राजेंद्र बावनकुळे यांनी दर्शन घेतले 


 गोंडवाना आदिवासी समाजाचे कुलदैवत कुवारा भिवसेन येथे रामटेक विधानसभेचे राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे अधिकृत उमेदवार शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या कुटुंब व कार्यकर्ते  सोबत रविवार दि.१७ नोव्हेंबर सायंकाळी दर्शन घेतले.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या