लक्झरी ने बाईकस्वारास उडविले, शरीराचे तुकडे होवून जागीच करुण अंत
आज दिनांक 30 एफ्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान आमडी गावात झालेल्या भिषण अपघातात दुचाकीस्वार राहणार नयाकुंड तालुका पारशिवनी निवासी रमेश सुखदेव बिराताल वय 50 वर्ष याचा जागीच करुण अंत झाला
मृतक रमेश बिराताल हा नयाकुंड वरून बाईक क्र . MH -4O - AN -9168 ने देवलापार ला कामगारांचे पेमेंट देण्याकरीता जात असता आमडी गावाजवळील महामार्गावर येताच नागपूर वरून बालाघाट ला जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स ने दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक रमेश बिराताल यांच्या शरीराचे जागो जागी तुकडे पडत गेले व दुचाकीचे सुद्धा तुकडे पडत गेले .अंदाजे 100 मिटर फरफटत नेल्यानंतर लक्झरी चालक लक्झरी सह फरार झाला .
संतप्त नागरिकांनी व नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वरील वाहतुक अडवून आमडी गावात अंडरपास बनविण्याची मागणी यावेळी केली
रामटेक पोलीसांनी संतप्त नागरीकांना शांत करून महामार्गावरील वाहतुक सुरळीत करून शवाचा पंचनामा केला .शव उपजिल्हा रुग्नालय रामटेक ला पाठविले असुन फरार लक्झरी चालकाचा शोध घेत आहेत
पुढाकार 24 करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्रा
0 टिप्पण्या