कन्हान पोलीस ठाण्यात दाखल विनयभंगाचा गुन्ह्यावर गंभीर प्रश्न निर्माण
पोलीसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर सत्य समोर येईल - पीडित
आमच्या विरुद्ध दाखल केलेली घटना पूर्णपणे खोटी व निरर्थक असल्याचे दिसून येईल - पीडित
पत्रकार परिषद द्वारे दाखल केलेली एफआईआर रद्द करण्याची मागणी
कन्हान : - कन्हान पोलीसांनी घरात बसलेल्या तीन नागरिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे . राजकीय दबावात येऊन पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याचे पत्रकार परिषदेत पीडितांनी सांगितले आणि दाखल केलेली एफआईआर रद्द करण्याची मागणी केली आहे .
प्रशांत वाघमारे यांनी त्यांचा सोबत घडलेल्या घटनेची लेखी तक्रार रविवार (दि.२०) जुलै रोजी दिली होती . घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी महिले विरुद्ध गुरुवार (दि.२४) जुलै रोजी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला . संबंधितांचे बयान नोंदवून आरोपी महिलेला पोलीस स्टेशन मधून तात्पुरती जामीन देण्यात आली , असे पत्रकार परिषद पीडितांनी सांगितले . आरोपी महिलेने राजकीय दबाव यंत्रणाचा वापर करीत पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना हाताशी धरून बुधवार (दि.३०) जुलै रोजी पीडितांन विरोधात तक्रार देण्यास लावली , असा आरोप प्रशांत वाघमारे , कोठीराम चकोले , कुबेर पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत केला .
महिलेने तक्रार दिल्याच्या पंधरा दिवसानंतर त्या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी प्रशांत वाघमारे , कोठीराम चकोले , कुबेर पोटभरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला . महिले द्वारा नोंदविल्या तक्रारीचे घटनेत , घटनेचा दिवस व वेळ प्रशांत वाघमारे आणि त्यांचे सहकारी मित्राच्या मोबाईलच्या लोकेशनशी व प्रशांत वाघमारे यांचा घरच्या सीसीटीव्ही फुटेजशी मेळ खात नाही . पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर सत्य समोर येईल व आमच्या विरुद्ध दाखल केलेली घटना पूर्णपणे खोटी व निरर्थक असल्याचे दिसून येईल . असे प्रशांत वाघमारे , कोठीराम चकोले , कुबेर पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
पीडितांनी घेतली अप्पर पोलीस अधिक्षकांची भेट , केली न्यायची मागणी
या संदर्भात प्रशांत वाघमारे , कोठीराम चकोले , कुबेर पोटभरे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांची भेट घेऊन न्यायची मागणी केली आहे .
योग्य तपास सुरु आहे - उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड
या प्रकरणा बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी महिलेच्या तक्रारी वरून रितसर पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आणि योग्य तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या