टेकाडी (को.ख.)च्या नवनियुक्त उपसरपंच त्रिभुवन सिंह यांचा श्री हनुमान मंदिर देवस्थानतर्फे सत्कार
कन्हान : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (कोळसा खदान) ग्रामपंचायत येथील नवनियुक्त उपसरपंच त्रिभुवन ओमप्रकाश सिंह यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल श्री हनुमान मंदिर देवस्थान, खदान रोड, कांद्री-कन्हान यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शनिवार (दि. २७ जून) रोजी श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे सकाळी आरती, प्रसाद वितरण व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे ज्येष्ठ सदस्य कवडूजी आकरे यांच्या हस्ते त्रिभुवन सिंह यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सत्कारनंतर उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी करत 'जय श्रीराम' व 'जय हनुमान' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसाद, चहा व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थानचे कवडू आकरे, रामा हिवरकर, वामन देशमुख, राधे राधे, मारोती आष्टनकर, गोल्डी पोटभरे, सुनील प्रजापती, वासुदेव आकरे, मनोजभाऊ कश्यप, विश्वकर्माजी, उषा वाडीभस्से, उषा वंजारी, सुनिता हिवरकर, सुमित्रा किरपान, मंगला कामडे, मालती वांढरे, इंदिरा मंसुहरे, इंदू टेंभरे तसेच भाविकांनी सहकार्य केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या