Advertisement

झाडे लावा, झाडे जगवाचा निर्धार ; भगिमहारी (पेंढरी) येथे वनमहोत्सव २०२६ उत्साहात साजरा


 झाडे लावा, झाडे जगवाचा निर्धार ; भगिमहारी (पेंढरी) येथे वनमहोत्सव २०२६ उत्साहात साजरा


'एक पेड माँ के नाम' उपक्रमातून शाळा व ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश


पारशिवणी : - वन विभाग, वनक्षेत्र पारशिवणी व सामाजिक वनीकरण विभाग, पारशिवणी यांच्या संयुक्त विद्यमाने गट ग्रामपंचायत भगिमहारी (पेंढरी) येथे शासनाच्या '१० कोटी वृक्ष लागवड – वनमहोत्सव २०२६' अंतर्गत 'झाडे लावा, झाडे जगवा' तसेच 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ऑक्सिजन पार्क परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व, हवामान बदलाचे वाढते दुष्परिणाम तसेच औषधी वनस्पतींची उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले.


यावेळी सरपंच सौ. ज्योती प्रेम भोंडेकर, उपसरपंच आनंद राऊत, ग्रामसेवक मोरेश्वर शेंडे, सदस्य संगीता खंडार, मनीषा भोंडे, सचिन सोंकुवर, कोमल उईके, इंदिरा मरकाम, वैशाली राऊत, सामाजिक कार्यकर्ते तथा संजय गांधी समिती सदस्य प्रेम भोंडेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गेडाम, वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अधिकारी जे. पी. मेंढे, क्षेत्र सहाय्यक धू. जे. मुळे, वनपाल डी. पी. टेकाम, वनरक्षक एस. एल. पिल्लेवान, ए. एन. जाधव, कु. डी. ए. नान्हे, कु. एस. वाय. कुरेंजेकर, वनपाल अनिल राठोड, वनरक्षक जे. व्ही. बेदरे यांच्यासह पारशिवणी वन विभागातील सर्व वनमजूर उपस्थित होते.


याशिवाय पंचायत समिती आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी अंकर साहेब, आरोग्य सहाय्यक तू. मून, वैद्य, आरोग्य सेवक खुबळकर, अंबुजा फाउंडेशनच्या उत्तम कापूस प्रकल्पाचे ईशान राऊत, सिद्धार्थ चांदेकर, अंकिता बोडेकर, श्वेता राऊत, कृष्णा केळवदे, शाळेचे मुख्याध्यापक चंदनखेडे सर, भुते सर, संकल्प महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा लता शेंडे, कोषाध्यक्ष शारदा गाताडे, सीआरपी आरती केळवदे, एफएलसी लता भड, सीटीसी नीतू काकडे, रोजगार सेवक दुर्योधन वरखडे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या