Advertisement

गहुहिवरा पुलाजवळ मृत अवस्थेत आढळली गोमाता


 गहुहिवरा पुलाजवळ मृत अवस्थेत आढळली गोमाता


गौसेवा समिती कन्हान क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांकडून विधिवत अंत्यसंस्कार


कन्हान : - कन्हान शहरातील गहूहिवरा पुलाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका गोमातेचा मृतदेह टाकून दिल्याची हृदयद्रावक व अमानवीय घटना समोर आली असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात व्यक्तीने गोमातेचा मृतदेह अशा प्रकारे बेवारस अवस्थेत टाकून दिल्याने मानवता आणि धार्मिक भावनांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


या घटनेची माहिती गौसेवा समिती कन्हान क्षेत्राचे सदस्य आयुष संतापे यांना मिळताच त्यांनी तात्काळ समितीचे प्रमुख शुभम बावनकर यांना कळविले. माहिती मिळताच शुभम बावनकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जेसीबीची व्यवस्था करून गोमातेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून वैदिक विधीनुसार गोमातेवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित गोसेवकांनी पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच हा अमानवीय प्रकार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.


या सेवाकार्यात गौसेवा समिती कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर, मार्गदर्शक बालकिशन गुप्ता, सदस्य आयुष संतापे, अमन गुप्ता, अजय पाली तसेच इतर सदस्य आणि पशुप्रेमी उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या