Advertisement

नगरसेवक केतन भिवगडे यांच्या मातोश्रींचे निधन ; कन्हान परिसरात शोककळा


 नगरसेवक केतन भिवगडे यांच्या मातोश्रींचे निधन ; कन्हान परिसरात शोककळा


माजी उपसरपंच कैलाश भिवगडे यांच्या पत्नी वंदना भिवगडे यांचे कॅन्सरने दुःखद निधन


कन्हान : कन्हान शहरातील माजी ग्रामपंचायत उपसरपंच कैलाशजी भिवगडे यांच्या पत्नी तसेच नगर परिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक केतन कैलाशजी भिवगडे यांच्या मातोश्री वंदना कैलाशजी भिवगडे यांचे शनिवारी (दि.२७ जून) रोजी पहाटे ५ वाजता कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा रेल्वे स्टेशन रोड, कन्हान येथील राहत्या घरातून दुपारी १२ वाजता निघाली. आजनी रोड, कामठी येथील शांतिघाटावर सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भिवगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कन्हान परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या