Advertisement

शिवसेना (उबाठा) पक्ष तालुका प्रमुख पद्दी रविंद्र चकोले यांची नियुक्ती


 शिवसेना (उबाठा) पक्ष तालुका प्रमुख पद्दी रविंद्र चकोले यांची नियुक्ती


कन्हान : - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटन मजबुतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत निलज (खंडाळा) येथिल रविंद्र रामचंद्र चकोले यांची रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी तालुका प्रमुख पद्दी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम मस्के यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली.


नियुक्तीपत्रात पक्षाची ध्येय-धोरणे व विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक बळकट करणे आणि पक्षवाढीसाठी सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील आदेशा पर्यंत कायम राहणार असल्याचे ही पत्रात नमुद करण्यात आले आहे. 


या नियुक्तीमुळे रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यां कडुन व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव , जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम मस्के यांनी नवनियुक्त तालुका प्रमुख रविंद्र चकोले यास पक्षाचा मशाल चिन्ह असलेला भगवा दुपट्टा व पुष्पहार घालुन आणि श्रीफळ देऊन पक्षात जल्लोषात स्वागत केले. 


या प्रसंगी कन्हान शहर प्रमुख भारत पगारे, कांद्री प्रमुख सुरेश आंबिलढुके, अँड.अभिलाष चकोले, जिवन ठवकर, चरण येरणे, संकिंत राऊळ, प्रदीप चकोेले, मंगेश अंबागडे, अमित राऊत, सुरेश चकोले सह शिवसैनिकांनी रविंद्र चकोले यांचे अभिनंदन केले. तसेच रविंद्र चकोले यांचे वर विविध स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन त्यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या