Advertisement

हिंदू देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आरोपीला अटक

 


हिंदू देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आरोपीला अटक


भगवान शंकरांविषयी आक्षेपार्ह व्हिडियो व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणे सलमान शेखला भोवले


कन्हान : - हिंदू धर्मातील भगवान शंकर महादेव यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ आणि अशोभनीय विधाने असलेले व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याप्रकरणी कन्हान पोलिसांनी तातडीने कारवाई करत कांद्री येथील सलमान शेख याला अटक केली आहे .

या प्रकरणी भारत माता सेवा संघटनेचे अध्यक्ष दीपक देवदास नेचवानी (वय ४२ रा. सुगतनगर, नागपूर) यांनी कन्हान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.


तक्रारीनुसार, गुरुवार (दि.२) जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान सुरज मिश्रा याने दिपक यांना फोन करुन सांगितले कि त्याच्या मोबाईलमध्ये ७७९८६७४७१७ हा क्रमांक "Gondegao Tyre Wale" या नावाने सेव्ह आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्स मध्ये हिंदू धर्मातील देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच अशोभनीय विधाने असलेला व्हिडिओ ठेवला आहे. त्यानंतर सूरज मिश्रा यांनी तो व्हिडिओ दिपक यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक ९३५६२०८११३ वर पाठविला.

त्यानंतर शुक्रवार (दि.३) जुलै रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास, पोलीस ठाणे कन्हान जवळ सूरज मिश्रा यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित "Gondegao Tyre Wale" या व्हॉट्सअॅप स्टेटसवरील व्हिडिओ मला प्रत्यक्ष दाखविला. त्या व्हिडिओमध्ये भगवान शंकर महादेव यांच्याबाबत आक्षेपार्ह दृश्ये व अशोभनीय विधाने असल्याचे दिपक यांना दिसून आले. सदर व्हिडिओमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने भारत माता सेवा संघटन आणि सकल हिंदु समाजच्या शैकडो पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन देऊन तात्काळ आरोपीला अटक करुन कायदेशीर कारवाईची मागणी केली होती . निवेदनाची गंभीर दखल घेत कन्हान पोलिसांनी तपास करून आरोपी सलमान शेख रा.कांद्री ला अटक करुन कलम २९९ , १९६(१)(c) , ३५३(१)(c) नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे . या कारवाईमुळे धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारे संदेश, व्हिडिओ अथवा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश पोलिसांच्या या कारवाईतून गेला आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या