टेकाडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा
कन्हान : - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त टेकाडी येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व शिवप्रेमींच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
"शिवराय मनामनात, शिवराय घराघरात" या उपक्रमांतर्गत गावभर भगवे ध्वज फडकावून शिवमय वातावरण निर्माण करण्यात आले. हनुमान मंदिर चौक, टेकाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुरेश मोहाडे, रविंद्र गणोरकर, हरिश्चंद्र ठाकरे, गोविंद शेंदरे, शिवनारायण आकोटकर व शिवशंकर आकोटकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमास गणेश मस्के, सुधाकर राऊळकर, राजेश मोरे, नत्थुजी कांबळे, प्रमोद मोरे, उमेश मोरे, अंकित लक्षणे, सचिन वाघमारे, सचिन भोयर, रामकृष्ण पावडे, संजय वासाडे यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरायांच्या विचारांचा जागर करून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान व सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या