कन्हान मध्ये दहावी,बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
कन्हान, कांद्री शहर विकास मंच च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - कन्हान शहर विकास मंच आणि कांद्री शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जुने कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला शिवपंचायत हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे दहावी आणि बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके , प्रमुख अतिथि जेष्ठ शिक्षक आणि संचालक पी.जी.खेरगडे , संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी दहावी , बारावीमध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमात प्रथय , द्वितीय व तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना नोटबुक , पेन देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमात मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करुन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पुढील काळातही आपण सर्व विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत आपले कन्हान , कांद्री शहराचे पालकांचे , शिक्षकांचे , शाळेचे , काॅलेजचे नाव अभिमानाने उंचवा , अशी खात्री मान्यवरांनी व्यक्त केली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन अर्जुन पात्रे यांनी केले। कार्यक्रमात विद्यार्थी , पालक , शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , ज्ञानेश्वर ऊके , अर्जुन पात्रे , प्रमोद गिऱ्हे , निखिल तांडेकर सुनिता मानकर , सुषमा मस्के , अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , अविनाश कांबळे , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , राहुल वानखेडे , रविंद्र कोच्चे , शुभम बावनकर , सुर्यभान चकोले , मृणाल सरोजकर , आयुष संतापे सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या