Advertisement

कु.आयुष बावनकुळे यांची भारतीय सैन्यात गौरवशाली निवड



कु.आयुष बावनकुळे यांची भारतीय सैन्यात गौरवशाली निवड


कन्हान - कांद्री शहर विकास मंचच्या वतीने सत्कार


कन्हान : - कांद्री येथील समाजसेवक विशाल चाफले यांचे भाचे कु.आयुष सुरेश बावनकुळे या होतकरू तरुणाची अवघ्या २१ व्या वर्षी भारतीय सैन्यात (Indian Army) निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . आयुष बावनकुळेच्या उल्लेखनीय यशाबद्दल कन्हान-कांद्री शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


आयुष बावनकुळे यांनी लहानपणापासूनच शिक्षणासाठी आपल्या मामांकडे, विशाल चाफले यांच्याकडे कांद्री येथे वास्तव्यास राहून शिक्षण पूर्ण केले. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी नगरधन येथील अकादमीत सैन्य भरतीचे कठोर प्रशिक्षण घेतले.


सन २०२४ मधील सैन्य भरती प्रक्रियेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पुन्हा तयारी सुरू ठेवली. अखेर सन २०२५ मधील भरती प्रक्रियेत सहभाग घेत संपूर्ण निवड प्रक्रियेत यश संपादन करत भारतीय सैन्यात स्थान मिळविले.


आयुष यांच्या या यशामुळे कांद्री, कन्हान तसेच संपूर्ण परिसराचा गौरव वाढला असून युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

याप्रसंगी कन्हान-कांद्री शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


या प्रसंगी कन्हान - कांद्री शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे, सुनिता मानकर, सुषमा मस्के, शुभम बावनकर, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, निखिल तांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या