Advertisement

कन्हान पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड


 कन्हान पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड


६ आरोपी अटक; ६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


कन्हान : न्यू मच्छी मार्केट परिसरातील जुनी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कन्हान पोलिसांनी धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



प्राप्त माहितीनुसार, मंगळवार (दि. ९ जून) रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे या आपल्या पथकासह परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, न्यू मच्छी मार्केट परिसरातील जुनी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या मागे काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांवर जुगार खेळत आहेत.

                                                                                                                                                               माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले. त्यांचा पाठलाग करण्यात आला, मात्र ते हाती लागले नाहीत.


कारवाईदरम्यान पोलिसांनी विकास नेवालाल भिसे (वय ३०), रॉकी सुरेश गायकवाड (वय ३४), अश्विन नंदू शेंडे (वय ३२, तिघेही रा. सत्रापूर, कन्हान), अशोक सुखदेव खोब्रागडे (वय ७०, रा. शिवनगर, कन्हान), शुभम नामदेव रंगारी (वय २३, रा. नगर परिषद परिसर, कन्हान) व दीपक शंकर खंगार (वय ३२, रा. पटेलनगर, कन्हान) यांना ताब्यात घेतले.


त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे ५२ ताशांचे पत्ते तसेच डावावरील १ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.


या प्रकरणी सरकारी फिर्यादी पोलीस कर्मचारी आकाश सिरसाट यांच्या तक्रारीवरून सहाही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करीत आहेत.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या