धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तात्काळ द्या
पारशिवनी तहसीलदार यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कन्हान : - महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ हंगामा तील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बोनस देण्याची घोषणा केली असतानां ही शेतकऱ्यांना अद्याप बोनसची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जाहीर करण्यात आलेला धान बोनस तात्काळ वितरित करण्यात यावी. या मागणीचे निवेदन रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तर्फे पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आले.
निवेदनात युवक काँग्रेसने स्पष्टपणे भूमिका मांडत धान उत्पादक शेतकरी हा राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असुन शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीं चा सामना करावा लागत आहे . शासनाने दिलेले आश्वासन पाळत जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टर धान बोनस तात्काळ वितरित करावा तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता लाभ देण्यात यावा .
“शेतकऱ्यांचा हक्काचा बोनस तात्काळ द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या !” अशी मागणी रामटेक विधान सभा युवक काँग्रेस तर्फे मा. तहसीलदार सुरेश वाघचौरे यांचा मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
निवेदन निखिल दा. पाटील अध्यक्ष,रामटेक विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस व गौरव भोयर उपाध्य क्ष, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात देण्यात आले . या प्रसंगी सचिन सोमकुवर , अभिषेक खंडाळे , आयुष मानकर , महेश धोंगडे , गौतम पाटील , राहुल चाफले , आर्यन गजभिये , कल्पक मुलतेली , जय ढोबळे , शुभम वाघमारे , प्रज्वल मेश्राम , मयुर साबरे सह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या