Advertisement

कांद्रीत सिलंबम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 


कांद्रीत सिलंबम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न


राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी ; कांद्रीच्या खेळाडूंनी उंचावला परिसराचा मान


कन्हान : - रामटेक येथे दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून विविध पदके पटकावणाऱ्या परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा, कांद्री येथील खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा सोमवार (दि. ८ जून) रोजी कांद्री जिल्हा परिषद मैदानात परमात्मा एक बहुउद्देशीय संस्था आणि परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मुन्नाजी यादव, कांद्री नगर पंचायतचे उपाध्यक्ष धर्मेंद्र सरोदे, कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, पोलीस पाटील कांचन मस्के, ज्येष्ठ शिक्षक हरीष पोटभरे, महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अजय खेडकरकर, नागपूर जिल्हा थाय बॉक्सिंग अध्यक्ष नरेश कोक्कडे, नागपूर जिल्हा थाय बॉक्सिंग ग्रामीण सचिव डॉ. अनिल गजभिए यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत त्यांना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या कर्तृत्वाने कांद्री परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंमुळे उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.


कार्यक्रमाची प्रास्ताविक धनी वंजारी यांनी मांडली. सूत्रसंचालन नागपूर जिल्हा थाय बॉक्सिंग ग्रामीण सचिव व सिलंबम प्रशिक्षक इंद्रपाल वंजारी यांनी केले, तर सुरक्षा वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.


याप्रसंगी नगरसेवक उमेश वाडीभस्मे, शिवाजी चकोले, राकेश लांजेवार, निकेश मेश्राम, पवन कुंभलकर, सुत्तम मस्के, पत्रकार मोतीराम राहाटे, ऋषभ बावनकर, शुभम बावनकर, आयुष संतापे, लोकेश दमाहे, नरेश कामडे, यशवंत आंभिलढुके, रोहित पानतावणे, दिनेश राऊत, मनोज भोले, रोशन भोयर, विवेक वांडरे, दुर्गेश कोमटी, भूषण तिरोडे, नैतिक मोखरकर, विशाखा वंजारी, स्विटी वांढरे, शकुंतला चांदेकर, कीर्ती सरोदे, रेखा मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम पंधरे, पियूष डेडूलकर, प्रज्वल मोखरकर, ओम सावरकर, ऋतुजा वंजारी, सुरक्षा वैद्य, कनक वाडीभस्मे, आरजू शर्मा, अमित लाडे, नैतिक बोरकुटे, अमर तिरोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या