Advertisement

गोंडेगाव खुल्या खदानीतुन कोळसा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 


गोंडेगाव खुल्या खदानीतुन कोळसा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


सात दुचाकी वाहने व कोळसा सह एकुण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


कन्हान पोलिसांची मोठी कारवाई ; सात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडेगाव येथील खुल्या कोळसा खदानीतून कोळसा चोरी करून नेत असलेल्या सात आरोपींना कन्हान पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील सात दुचाकी वाहने व दगडी कोळसा असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार (दि. ५ जून) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , जैलाल सहारे , हरिष सोनभद्रे , अमित यादव , अश्विन गजभिए , मोहित झाडे , पर्णित दहिवले सह त्यांच्या पथकातील अधिकारी-कर्मचारी रात्री गस्त घालत होते. पहाटेच्या सुमारास गोंडेगाव शिवारात काही युवक दुचाकींवर कोळशाने भरलेल्या बोऱ्या बांधून नेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात युवकांना ताब्यात घेतले. याबाबत वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानचे प्रभारी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षक छत्रपाल राजपूत व कृणाल हुलके घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान आरोपींनी गोंडेगाव खुल्या कोळसा खदानीतील डम्पिंग यार्डमधून कोळसा चोरी केल्याची कबुली दिली.


पोलिसांनी संदीप पेंदोरे, अर्जुन मडावी, संगुलशन मेश्राम, वसंता आंबाडारे, अंकुश सहानी, रिंकुलाल कश्यप आणि प्रवीण कुकुडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सात दुचाकी वाहने व दगडी कोळसा असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहेत .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या