निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेत त्रुट्या राहू नयेत याची दक्षता घ्या - निवडणूक निरिक्षक संजय यादव
नागपूर : - नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेत चुका अथवा त्रुट्या राहू नयेत याची काटेकोर दक्षता सर्व नोडल अधिकाऱ्यांनी घेण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक निरिक्षक संजय यादव यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार (दि.४) जुन रोजी त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले . या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.रचना इंदुरकर व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते .
या निवडणुकीसाठी 836 मतदार असून 2 उमेदवार रिंगणात आहेत . या निवडणूकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार असून याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बैठकीत आढावा घेण्यात आला . मतदान साहित्य , आदर्श आचार संहिता आदी बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या