डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाची मागणी
कन्हान : - महामहीम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कांन्द्री यांच्या मार्फत निवेदन पाठवुन दरवाढ कमी करून महागाई वर अकुंश लावावा . तसेच डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र प्रवर्गात नोंद करण्याी मागणी करण्यात आली .
केंद्र शासनाकडुन सातत्याने होत असलेल्या डिझेल , पेट्रोल व गॅस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक , शेतकरी व कामगार वर्गावर वाढत चाललेल्या महागाईच्या ताणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले . वाढत्या इंधन दरामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण होत असुन शासनाने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली .
तसेच सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग , स्वतंत्र कोड व स्वतंत्र रकाना उपलब्ध नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . अनुसूचित जाती व जमातीप्रमाणेच ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असुन त्याशिवाय ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या शासनाकडे उपलब्ध होणार नाही , असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे . ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या उपलब्ध नसल्यास भविष्यात विविध शासकीय योजना , शैक्षणिक सुविधा , नोकरीतील आरक्षण व राजकीय प्रतिनिधित्व यामध्ये समाजावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले . यास्तव शासनाने तात्काळ दखल घेऊन डिजिटल जनगणना मोबाईल अँपमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग व कोड उपलब्ध करून द्यावा , अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .
या निवेदनावर विविध पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असुन परिसरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कान्द्री (कन्हान) यांच्या मार्फत निवेदन सादर करतांना बलवंत पडोळे , राजु देशमुख , निकेश मेश्राम , महेश झोडावणे , नितु परते , शुभांगी कुंभलकर , चंद्रशेखर बावनकुळे , गणेश सरोदे , भुपेंद्र पोटभरे , विक्की पारधी , बंटी परते , अश्विन अंबादे सह आदि नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर

0 टिप्पण्या