यशवंत विद्यालय वराडा दहावी चा १०० % निकाल
कु. संजना मोकरकर ७९.२० % प्रथम , आकाश फाये ७६.६०% व्दितीय , कु.हर्षा नागपुरे ७४.६०% तृतीय , जानवी मानवटकर ७४% चतृर्थ क्रमांक.
कन्हान : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षा इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर झाला .
या मध्ये यशवंत विद्यालय वराडा चा १०० % निकाल लागला असुन कु.संजना मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे . यशवंत विद्यालय वराडा पारशिवनी या माध्यमिक शाळेतुन एकुण ३३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३३ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
कु. संजना हेमराज मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून यशवंत विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे . व्दितीय आकाश जितेंद्र फाये याला ७६.६० % , तृतिय कु. हर्षा अशोक नागपुरे हिला ७४.६० % गुण , चतृर्थ कु. जानवी अंनता मानवटकर हिला ७४ % गुण , पाचवी कु.पुर्वा ईश्वर टाले हिला ७३. ८० % , सहावी कु.पुजा दिवाकर चौधरी हिला ७२ % , सातवी कु. श्रावणी किशोर फलके हिला ७१.४० % , तर कु.समिक्षा मनोहर दिघडे हिला ७१.२० % गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकाविल्याने या गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यशवंत विद्यालय वराडा या ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी च्या परिक्षेत १०० % निकाल लागल्याने शाळेचे संचालक मा. भुषणराव निंबाळकर सर यानी मुख्याध्यापिका के. बी निंबाळकर , वर्ग शिक्षिका अर्चना शिंगणे व शिक्षक राजेंद्र गभणे , राकेश गणविर , सतिश कुथे , मोतीराम रहाटे , दिपक पांडे तसेच सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या