Advertisement

भंगार रसायनयुक्त टॅंकरने पाणी.पुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात.


 भंगार रसायनयुक्त टॅंकरने पाणी.पुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

चालक मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी राजेश भांगे यांची मागणी 


राजेश भांगे ठाणे ,


मुरबाड:- तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासकीय यंत्रणा कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी त्यांचे  कोरड्या घशाला ओलावा देण्यासाठी भंगार आणि रसायनयुक्त टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन ते पाणी पिण्यासाठी न वापरता ते धुणीभांडी घासण्यासाठी साठा करून ठेवत असल्याचे समोर येत असल्याने पाणी टंचाई वर कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेली उपाययोजना कुचकामी ठरली आहे.


       मुरबाड तालुक्यातील सुमारे २०६ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासनाने जल जीवन योजनेच्या माध्यमातून'' हर घर नल ,हर घर जल.हे अभियान सुरू केले असुन प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या परंतु ठेकेदाराने त्या योजनेचे काम विस पंचवीस टक्के करुन तांत्रिक अडचणी पुढे करत आपली बिले पदरात पाडून घेत पळ काढला असल्याने २०६ योजनेपैकी केवळ ८६ योजना पूर्ण झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभाग करत आहे.या कोट्यवधी रुपयांच्या योजना सपशेल फेल गेल्याने सासणे, तोंडली,पाटगाव,साकुर्ली,सायले,दिवाण,खनिवरे, पाडा,वाघवाडी,,झाडघर,बांगरवाडी,केव्हारवाडी,या गावत भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन त्या ठिकाणी तातडीची उपाययोजना योजना म्हणून पंचायत समितीने तीन टॅंकर तैनात केले असुन ते टॅंकर रसायनयुक्त असल्याने त्या टॅंकर मधुन जरी एम.आय.डी.सी चे फिल्टर पाण्याचा पुरवठा होत असला तरी या पाण्या पासुन काही बाधा होते की काय या भितीने ते पाणी पिण्यासाठी न वापरता किंवा जनावरांना न देता धुणीभांडी करण्यासाठी प्लास्टिक च्या ड्रम मध्ये साठवून ठेवले जाते.दरम्यान पाणी टंचाई वर उपाययोजना करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जिल्हा प्रशासनाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. रासायनीक टॅंकरने पाणी पुरवठा करणाऱ्या चालक मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिस मित्र मानधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या