Advertisement

कन्हान मध्ये पाणीटंचाई चा प्रश्न टोकावर , वेकोलि अधिकाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी


कन्हान मध्ये पाणीटंचाई चा प्रश्न टोकावर , वेकोलि अधिकाऱ्यांचा  विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी


नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांचा नेतृत्वात शिष्ठमंडळाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन 


कन्हान : - कन्हान - पिपरी नगरपरिषद क्षेत्रात वेकोलि अधिकाऱ्यांचा निष्क्रियतेमुळे उद्भवलेला पाणीटंचाई चा प्रश्न टोकावर पोहचला आहे . कन्हान - पिपरी नगर परिषद चे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेतली आणि या गंभीर विषयावर चर्चा करुन वेकोलि अधिकाऱ्यांचा  विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन पत्र देऊन करण्यात आली आहे .


निवेदनात नमुद केले आहे कि, कन्हान - पिपरी नगर परिषद क्षेत्रातील स्वामी विवेकानंद नगर येथील हिराबाई शाळे जवळ पाण्याची टाकी येथे वेकोलि चे सीएसआर निधीतुन वर्ष २०१६-१७ मध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्थेसाठी पाणी फिल्टर व तत्सम योजना तयार करून देण्यात आली होती . परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून सदर योजना नादुरुस्त असून बंद अवस्थेत पडली आहे . सोबतच उन्हाळा ऋतु सुरू असून सदरचा त्रास हा स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे . या संदर्भात वेकोलि अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार , पत्रव्यवहार व क्षेत्र भेट देऊन ही वेकोलि मार्फत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे . फिल्टर प्लांट मध्ये पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही वेकोलिची अधिकाऱ्यांची असुन टाळाटाळीचे उत्तरे देत आहे . वेकोलि अधिकाऱ्यांचा निष्क्रियतेमुळे शहरात भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवलेल्याने नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , उपाध्यक्ष रिकेंश चवरे आणि सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेऊन आणि एक निवेदन पत्र देऊन वेकोलिच्या संबंधित अधिकाऱ्यांवर एफ आई आर दाखल करण्याची मागणी केली आहे .


या प्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , उपाध्यक्ष रिकेंश चवरे , नगरसेवक विनोद किरपान , प्रशांत पाटील , केतन भिवगडे , शक्ती पात्रे , शिवशंकर वाकुडकर , मनोज कुरडकर , महेंद्र साबरे , मयुर माटे , नगरसेविका योगिता भेलावे , सुषमा चोपकर , पुनम राठी , सुनंदा दिवटे सह आदि उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या