Advertisement

खेडी गावातील तीन आश्वासक तरुणांची नागपूर पोलिसांमध्ये निवड, गावात आनंदाचे वातावरण


खेडी गावातील तीन आश्वासक तरुणांची नागपूर पोलिसांमध्ये निवड, गावात आनंदाचे वातावरण


अपोलो अकादमीतील मेहनतीचे फळ, पालक आणि कुटुंबियांमध्ये आनंद


कान्हान -  पारशिवनी तालुक्याचा खेडी गावातील तीन आश्वासक तरुणांनी आपल्या संघर्ष, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर नागपूर पोलिसांमध्ये निवड होऊन संपूर्ण परिसराला गौरव मिळवून दिला आहे . एकाच वेळी तीघांची पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .


निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आचल नंदुजी इंगळे, राकेश सुभाष कोचे आणि साहिल प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. हे तरुण काही वर्षांपूर्वी अपोलो अकादमीमध्ये दाखल झाले आणि तिथे दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सराव व अभ्यास करत राहिले . मर्यादित संसाधने असूनही , या तरुणांनी अथक परिश्रमाने हे स्थान मिळवले आहे.


अलीकडेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. या पोलीस भरतीत खेडी गावातील तीन तरुणांनी पोलीस भरतीत लक्षणीय यश मिळवले आहे. त्यांचे वडील शेतकरी असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कठीण परिस्थितीवर मात करून, त्यांनी आपल्या पालकांच्या कष्टाला हातभार लावत यश मिळवले आहे. तिघांचीही एकाच वेळी महाराष्ट्र पोलिसात निवड झाल्याचा कुटुंबाला अभिमान आहे. संभाषणादरम्यान, त्या तरुणांनी सांगितले की, कठीण परिस्थिती असूनही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही आणि आपली तयारी सुरूच ठेवली. त्यांच्या निवडीची बातमी खेडी गावात पोहोचताच, कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. लहानपणापासूनच आचल, राकेश आणि साहिल यांनी पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले. चिकाटीने त्यांनी मोठे यश मिळवले आहे. इंगळे आणि कोचे कुटुंबातील या तरुणांचे यश आता इतर तरुणांना प्रेरणा देत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या