Advertisement

सरस्वती न्यु इंग्लिश शाळा कन्हान चा निकाल १००%


 सरस्वती न्यु इंग्लिश शाळा कन्हान चा निकाल १००%


शौर्य चव्हाण ९२% प्रथम , कु.विधी नागपुरे ८५% द्वितीय , आदित्य गजभिए ८०% तृतीय


कन्हान : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी (SSC) चा निकाल ८ मे रोजी जाहीर केला. यामध्ये कन्हान शहरातील सरस्वती न्यू इंग्लिश शाळा अँड ज्युनिअर कॉलेज एसएससी चा निकाल १००% लागला . शाळेतुन शौर्य चव्हाण याने ९२% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला . विधी नागपुरे हिने ८५% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला , आदित्य गजभिए ८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला , धनंजय चव्हाण याने ७९% गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला , कु.अंकिता यादव हिने ७६% गुण मिळवुन पाचवा क्रमांक पटकाविला आणि रोहित नन्हे याने ७३% गुण मिळवुन सहावा क्रमांक पटकाविला आहे . सरस्वती न्यू इंग्लिश शाळेतुन एकूण ३८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी सहभागी झाले होते. यापैकी सर्व ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल १००% लागला. ‌शाळेच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखल्याने शाळेचे संचालक मा.पी.जी खेरगडे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक विक्की इंगोले , प्रणय दाढे , शिक्षिका पूनम कुशवाह , अंकिता पारस्कर , अर्पणा पाटील , सविता उपाध्याय , राणी तिवारी , कल्याणी खंडार सह आदी शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदन केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या