गळफासाने आत्महत्या चा पर्यंत , संदीप नागोसे चा उपचारा दरम्यान मुत्यु
कन्हान : - गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मेयो रुग्णालय नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे .
मृतक संदीप अरविंद नागोसे वय ४२ वर्ष रा. कळंब वार्ड क्र.१ जिल्हा यवतमाळ हा फोर व्हिलर चालक असुन रवी राऊत यांचे सोबत घराचे सामान मध्यप्रदेश राज्यात सोडण्याकरिता भाड्याने गाडीवर गेला व बुधवार (दि.२९) एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान परत येत असतांना संदीप कान्द्री कन्हान परिसरात गाडीतुन उतरुन वेळ्या सास्खा बोलुन वागुन शेतात पळुन गेला . रवी राऊत यांनी मृतकाची पत्नीला सांगितले . पत्नी त्यांचा शोध घेत असतांना पोलीसांनी सांगितले कि , अनोळखी वेळसर तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचारा करिता नेले आहे . फिर्यादी कविता संदीप नागोसे हिने जावुन पाहिले असता तेथील डाॅक्टरांनी पुढील उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केले . तसेत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचार कामी आनलेले लोकांना विचारपुस केली . तर त्यांनी सांगितले कि , मृतक संदीप हा वेडा सारखा वागत होता व रस्सी ने गळफांस तयार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करित असतांना त्यांस उपचार करिता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे आणले .
शनिवार (दि.२) मई रोजी मृतक हा उपचार घेत असतांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले . सदर प्रकरणी मृतकाची पत्नी च्या बयाना वरुन कन्हान पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या