Advertisement

पारस माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती


 पारस माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती


रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे थाटात उद्घाटन ; मान्यवरांची उपस्थिती


कन्हान : - श्री संताजी अखिल तेली समाज संघटन रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी पारस मोरेश्वर माकडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने समस्त पदाधिकारी व समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे . सामाजिक , संघटनात्मक व युवकांच्या प्रश्नांवर सक्रिय कार्य करणाऱ्या पारस माकडे यांच्या नियुक्तीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .


दरम्यान , कन्हान तारसा रोड येथील महाकाली कॉम्प्लेक्स मध्ये रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले . “वीर पुत्र शहीद प्रकाश देशमुख” यांच्या वीरमाता लिलाबाई देशमुख व राधेश्याम हटवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

यावेळी पारस माकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे “वाढदिवस भेट” म्हणून ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन स्वागत केले .


कार्यक्रमाला अनिल बजाईत , जिल्हा कार्यवाह सूर्यभान चकोले , विलास घारपींडे , रामटेक तालुकाध्यक्ष बबीता कोठेकर , ऋषभ बावनकर , हरिभक्त परायण , कल्पना देशमुख , पारशिवनी तालुका महिला अध्यक्ष सुनिता मानकर , सुषमा मस्के , भैय्यालाल माकडे , मोरेश्वर माकडे आदी मान्यवर उपस्थित होते .



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कृणाल माकडे , रोशनी झोड , रितिक महाजन , विजय देशमुख , प्रवीण देशमुख , बाल्या भाऊ आकरे , नुपूर बजाईत यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाच्या शेवटी कांचनमाला मोरेश्वर माकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला . या प्रसंगी अविनाश कांबळे , राजू मस्के, नीलकंठ मस्के, प्रशांत मसार , मोहन जाधव, कमल यादव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या