बोरडा शेतात महिलेशी अश्लिल चाळे , आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथील शेतात ३३ वर्षिय महिला शेतातील घराचे काम पाहणी करित असतांना शेतात काम करणारा मजुर अरूण तडस यांनी महिलेशी अश्लिल चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे .
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१) मई रोजी दुपारी बोरडा (गणेशी) येथील घटस्फोटित ३३ वर्षीय महिला ही आपल्या वडिलाच्या शेतात घर कामाची पाहणी करित असतांना शेतात आठ दिवसा पासुन काम करणारा मजुर अरूण तडस (वय ४७) रा. निमखेडा हा ३ वाजता कामावर आला आणि अंदाजे दुपारी ३.३० वा. दरम्यान कालम चे काम सुरु असतांना महिला प्लास्टीक ड्रामवर बसुन कालम च्या पाटीला हात पकडुन बसली असता अरुण तडस यांनी माडीवर हात लावल्याने ती ड्रामचे खाली उतरत असतांना त्यांने सामोरुन तिचा हात ओढुन मागुन चेस्ट ला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने जोरात आरडा ओरडा केली . तेव्हा तो म्हणाला कि, दोन मिनटाचे काम आहे , असे बोलुन तिचा हात पकडला असता तिने हात झटकुन माझे वडिलांना सांगणार असे म्हटल्याने तो घाबरुन गेला व ती तेथुन निघुन गेली . त्यांने महिलेशी लज्जा निर्माण व्हावी असे कृत्य केल्याने सदर प्रकरण तिने घराचे लोकांना सांगितले. परंतु तिची प्रकृती बरोबर नसल्याने महिलेनी दुसऱ्या दिवशी रविवार (दि.३) मई रोजी आरोपी विरूध्द तक्रार केल्याने पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीसांनी आरोपी अरूण तडस विरूध्द कलम ७४, ७५ (१), ७५(२) भा.न्या.स २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील सखोल तपास कन्हान पोलीस करित आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या