श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन महाराष्ट्र दिवस साजरा
कन्हान : - सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने शिवाजी नगर कन्हान येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करुन महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला .
शुक्रवार (दि.१) मई रोजी महाराष्ट्र दिवस निमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ नागरिक भरत सावळे , मुलचंद शिंदेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी हिमांशु सावरकर यांनी शिवगर्जना प्रस्तुत केली . तसेच भरत सावळे , मुलचंद शिंदेकर यांनी महाराष्ट्र दिवस निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मां साहेब यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .
या प्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे , मुलचंद शिंदेकर , सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर , आयुष संतापे , हिमांशु सावरकर , ऋषभ बावनकर , सिद्धार्थ पुंडे , मोहित , हितेश राजपुत , शंकर सुरुसे , जयराम तिडके , रवी सिंग सोलंकी , विक्की सोलंकी , नलुबाई रायपुरकर , मीरा तिडके , भारती सोलंकी , गीताबाई सावळे , कुंदाताई वैद्य , कुंती टिक्कम सह आदि नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या