Advertisement

तेली समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिकतेची जोड जवाहर विद्यार्थी गृहात ११०० वर-वधूंच्या “सुयोग” पुस्तकाचे होणार विमोचन


 तेली समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिकतेची जोड जवाहर विद्यार्थी गृहात ११०० वर-वधूंच्या “सुयोग” पुस्तकाचे होणार विमोचन


नागपूर - समाजातील युवक - युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा , पारंपरिक वैवाहिक संस्कृतीला संघटित व्यासपीठ मिळावे तसेच समाजातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृह संस्था यांच्या वतीने भव्य वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . हा मेळावा रविवार दि.१७ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता सिव्हील लाईन्स येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न होणार आहे .

या मेळाव्यात तेली समाजातील तब्बल ११०० वर - वधूंचा परिचय समाविष्ट असलेल्या “सुयोग” या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येणार असून , समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिक माहिती व्यवस्थेची जोड देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मानले जात आहे . समाजातील युवक - युवती , पालक आणि नातेवाईकांना एकाच व्यासपीठावर आणून सामाजिक सलोखा , कौटुंबिक संवाद आणि सांस्कृतिक बांधिलकी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे .


संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले “सुयोग” पुस्तक हे समाजासाठी मार्गदर्शक ठरणार असून , विमोचनानंतर हे पुस्तक संस्थेच्या सिव्हील लाईन्स तसेच नंदनवन येथील कार्यालयात उपलब्ध राहणार आहे . समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला सुलभ , पारदर्शक आणि विश्वासार्ह दिशा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे . आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत समाज संघटन , शैक्षणिक प्रगती आणि सांस्कृतिक जतन यासाठी अशा मेळाव्यांची आवश्यकता अधिक वाढली असल्याचे मत समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे . युवक - युवतींना सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजातील एकोप्याचा संदेशही या मेळाव्यातून दिला जाणार आहे . या कार्यक्रमाला इच्छुक वर - वधू , त्यांचे पालक तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे व मुख्य कार्यवाह गंगाधर काचोरे यांनी केले आहे .


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष नरेंद्रकुमार दिवटे , सहकार्यवाह हर्षवर्धन बेले , कोषाध्यक्ष बालानंद टापरे यांच्यासह प्रा. प्रज्ञा बडवाईक , लोकनाथ भुरे , चंद्रकांत ढोबळे , कृष्णा घुगुसकर , विजय (बंडु) मोटघरे , प्रा. डॉ. रमेश पिसे , अनिल साखरकर , प्रकाश तिळगुळे , सुखदेव वंजारी , प्रफुल्ल रेवतकर तसेच वर-वधू परिचय सोहळा समितीचे हरिश जयपुरकर , प्रविण अंबागडे , हरिष दांडेकर , रवि उराडे , देवेंद्र वाडीभस्मे आणि नंदकिशोर थोटे हे परिश्रम घेत आहेत .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या