पाणी वापर संस्था व्दारे संवाद व कार्यशाळा संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६
कन्हान : - राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्य ३०० व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ अंतर्गत लाभ क्षेत्रातील समस्त पाणी वापर संस्था व्दारे संवाद व कार्यशाळा संपन्न करण्यात आली .
पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ अंतर्गत लाभ क्षेत्रातील समस्त पाणी वापर संस्था व्दारे संवाद व कार्यशाळेचे मा.मुकुंद डांगे साहेब उपविभागीय अभियंता टेकाडी यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले . यावेळी मा.दिपक गौर साहेब शाखा अभियंता टेकाडी २, मा. तुळशीराम काळमेघ लेखा परिक्षक नागपुर , भंडारा जिल्हा व समस्त पाणी वापर संस्था यांचे तर्फे दिप प्रज्वलन आणि पुष्प अर्पण करण्यात आले. व्यासपीठा वरील मान्यवरांचे स्वागत सर्व पाणी वापर संस्था अध्यक्ष/सचिव यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुकुंद डांगे साहेब उपविभागीय अभियंता टेकाडी यांनी शेतकरी व पाणी वापर संस्था यांना आधुनिक जल नियोजन , पाण्याचा कार्यक्षम वापर , शेती आणि पिक नियोजना बाबद मार्गदर्शन केले .
मा.दिपक गौर शाखा अभियंता टेकाडी २ यांनी पाणी वापर संस्था सक्षमीकरण या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले . मा. तुळशीराम काळमेघ लेखा परिक्षक नागपुर, भंडारा जिल्हा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन प्रसंगावर आणि अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान , कामगिरी , अनेक मंदिराच्या आश्रयदा त्या असुन जल व्यवस्थापन व पाणी वापर संस्थाचे कार्याबद्दल सर्वांना समजावुन सांगितले . समस्त पाणी वापर संस्था तर्फे कांद्री किसान पाणी वापर संस्थाचे सचिव मा.जयराम मेहरकुळे यांनी पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी सिंचन शेतकऱ्यां कडुन व्यवस्थापन , प्रभावी अंमलबजावणी व त्या अंतर्गत स्थापन झालेल्या पाणी वापर संस्थांच्या अडी अडचणीचे निराकरण करून त्यांना प्रभावी कार्यक्षम करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे आयोजन गणेश मस्के , श्रीराम नांदुरकर व समस्त पाणी वापर संस्था यांनी केले . प्रास्तविक श्रीराम नांदुरकर व सूत्र संचालन रविंद्र चकोले तर आभार शिवाजी चकोले यानी व्यक्त केले . पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ चे सेवानिवृत कर्मचारी श्री.गिऱ्हे, श्री. सोनकुसरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमात मा. गुणवंत ठाकरे दप्तर लिपिक , मा. सुजित कुंभमवार दप्तर लिपिक उपस्थित होते . श्याम बावनकुळे , दुर्योधन ठाकरे , मनोहर सरोदे , मधुकर बंड , तुळशीराम बालकोटे , नरेंद्र ठाकरे , सुखदेव पानतावणे , अनिल सोनसरे , ईश्वर सोनसरे , श्रावण बरबटकर , दशरथ सोनसरे , कवडु सराटकार , पिंटु मोखारे , हरिश वैद्य , लोकेश महादुले , पुंडलिक वानखेडे आदीनी कार्यक्रम यशस्वितेकरिता सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या