Advertisement

धर्मराज विद्यालय दहावीचा निकाल ९६.८९ प्रतिशत


धर्मराज विद्यालय दहावीचा निकाल ९६.८९ प्रतिशत 


कीर्ती पोटभरे ९०.६०% प्रथम , भाग्यश्री दोडके ८९.४० % द्वितीय और रीतीका छलिया ८९.२० % तृतीय 


कन्हान : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी (SSC) चा निकाल ८ मे रोजी जाहीर केला . यामध्ये कन्हान शहरातील धर्मराज महाविद्यालय कांद्री चा निकाल ९६.८९ % लागला . विद्यालयातुन किर्ती पोटभरे हिने ९०.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, भाग्यश्री दोडके हिने ८९.४० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर रीतीका छलीया हिने ८९.२० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे .


धर्मराज विद्यालयातुन एकूण १९३विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी सहभागी झाले होते. यापैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा निकाल ९६.८९ लागला.


विद्यालयाचे संचालक मा. खुशाल पाहुणे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक प्रकाश डुकरे, उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, प्राध्यापक हरीश पोटभरे, शिक्षक विलास डाखोळे, अनिल मंगर आदी शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे अभिनंदन केले.


सह संपादक - ऋषभ बावनकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या