Advertisement

धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय, कन्हान चा निकाल १०० प्रतिशत

Uploading: 114625 of 1574710 bytes uploaded.
Uploading: 131000 of 177993 bytes uploaded.

धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय, कन्हान चा निकाल १०० प्रतिशत

पारशिवनी तालुक्यात कु. अविका पाहुणे ८९.१७% गुणांसह प्रथम , राज चंद्रोल ८४.१७% गुणांसह द्वितीय आणि खुशी मनोज शाह हिने ७२.८३% गुणांसह तृतीय 


कन्हान : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी (HSC) चा निकाल २ मे रोजी जाहीर केला. यामध्ये कन्हान शहरातील धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% लागला असून, पारशिवनी तालुक्यातून कु. अविका पाहुणे हिने ८९.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर राज चंद्रोल याने ८४.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि खुशी मनोज शाह हिने ७२.८३% गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

Uploading: 115270 of 115270 bytes uploaded.


धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय, कांद्री - कन्हान येथे विज्ञान शाखेतून एकूण ८० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी सहभागी झाले होते. यापैकी सर्व ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा निकाल १००% लागला.


धर्मराज कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी पारशिवनी तालुक्यात कन्हान शहराचे नाव उज्ज्वल केले. कु. अविका संतोष पाहुणे हिने ८९.१७% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला, तर राज मिथिलेश चंद्रोल याने ८४.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि खुशी मनोज शाह हिने ७२.८३% गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.



धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय, कांद्री-कन्हानने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखली. याबद्दल संस्थेचे संचालक मा. खुशाल पाहुणे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच अविका पाहुणे व राज चंद्रोल यांनी तालुक्यात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संचालक मा. खुशाल पाहुणे, मुख्याध्यापक प्रकाश डुकरे, उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, प्राध्यापक हरीश पोटभरे, शिक्षक विलास डाखोळे, अनिल मंगर आदी शिक्षकांनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे अभिनंदन केले.


सह संपादक - ऋषभ बावनकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या