कन्हानच्या माजी नगराध्यक्षांची कन्या अक्षीदा पणिकरचे दैदीप्यमान यश
प्रफुल अंबादे यांच्याकडून सत्कार
कन्हान: - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत कन्हानच्या माजी नगराध्यक्षा आशाताई पणिकर यांची सुकन्या कुमारी अक्षीदा सनोज पणिकर हिने ९२.८०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे . अक्षीदाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून , तिच्या या कामगिरीने पणिकर कुटुंबासह संपूर्ण कन्हान शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .
या यशाचे औचित्य साधून रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रसिद्ध समाजसेवक ऍड.प्रफुल अंबादे यांनी अक्षीदाच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . यावेळी अक्षीदाचा पुष्परोप आणि मिठाई देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व तिला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या .
या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अक्षीदाशी शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा केली . "भविष्यात आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने शिक्षण पूर्ण करून तू कन्हान शहराच्या नावलौकिकात भर घालशील आणि तुझ्या अनुभवाचा फायदा समाजाला होईल,"अशा शब्दांत ऍड.प्रफुल अंबादे यांनी तिला मार्गदर्शन केले . या प्रसंगी संजय चाहंदे, विवेक पाटील यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या