श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
कन्हान : - सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने शिवाजी नगर कन्हान येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अभिवादन करुन साजरी करण्यात आली .
गुरुवार (दि.१५) मई रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती निमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शुभम बावनकर , जेष्ठ नागरिक भरत सावळे , मुलचंद शिंदेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब , छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी भरत सावळे , मुलचंद शिंदेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे , मुलचंद शिंदेकर , नगरसेवक हरिष तिडके , सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर , हिमांशु सावरकर , ऋषभ बावनकर , वामन येवले , जयराम तिडके , रवी सिंग सोलंकी , अशोक रायपुरकर , साहेबराव खेरडे , गीताबाई सावळे , लक्ष्मी सोलंकी , ममता साखरे , कुंती टिक्कम सह आदि नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या