भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान चा ७७.९० % निकाल
वाणिज्य शाखेचा १०० % , तर कला शाखेचा ६६.०७ % निकाल.
कला शाखेतुन कु.मानवी बिसने ६६ .६७ % प्रथम , वाणिज्य शाखेत कु. मिनाक्षी मेहर ७७.८३३% प्रथम.
कन्हान : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला . भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान चा वाणिज्य शाखेचा १०० % निकाल लागला असुन कला शाखेचा ६६.०७ % निकाल असुन एकुण कनिष्ट महाविद्यालयाचा ७७.९० % निकाल आहे . वाणिज्य शाखेतुन प्रथम कु.मिनाक्षी मेहर हिने ७७.३३ % तर कला शाखेत प्रथम कु.मानवी बिसने ६६.६७ % गुण प्राप्त करून कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे .
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान येथील कला शाखेतुन एकुण ११२ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ७४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने ६६.०७% निकाल लागला . या मध्ये प्रथम कु.मानवी बिसने ६६.६७ % , व्दितीय कु.समिक्षा यादव ६३.८३ % , तृतिय कु.श्री वकलकर ६३% प्रतिशत मिळाले
वाणिज्य शाखेतुन ६० विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ६० विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने १०० % निकाल लागला . या मध्ये प्रथम कु.मिनाक्षी मेहर ७७.३३% , व्दितीय कु.आकांशा लोधी ७६.३३ % , तृतिय कु.संजिवनी वासनिक ७५.५३% गुण प्राप्त केले .
कला आणि वाणिज्य दोन्ही शाखेतुन १७२ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन १३४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या कनिष्ट महाविद्याल याचा ७७.९० % निकाल लागला आहे . या कनिष्ट महाविलयाचे संचालक मंडळाचे प्रकाश नाईक , छाया नाईक , मनोहरराव कोल्हे सह समस्थ मंडळाने प्राचार्य , सर्व विषय शिक्षकांचे आणि सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या