श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे पंगतीत भव्य महाप्रसाद सोहळा संपन्न
श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाने हनुमान जन्मोत्सव थाटात.
कन्हान : - श्री हनुमान मंदीर देवस्थान टेकाडी व्दारे श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान मंदीर टेकाडी येथे अखंड भजन हरिनाम सप्ताहात भजन मंडळानी पहारा देत श्री हनुमान जयंती ला दही काला व भव्य महाप्रसाद वितरण करून " जय श्री हनुमान " चा जय घोष करित श्री हनुमान जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
A grand Mahaprasad ceremony was successfully held during the community feast at the Shri Hanuman Temple, Tekadi.
श्रीराम, लक्ष्मण व सिता वनवासा दरम्यान टेकाडी येथील श्री राम सरोवर टेकाडी येथे थाबुन टेकाडी गावची भुमी पावन झाल्याने दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गुरूवार (दि.२६ ) मार्च ते गुरुवार (दि.२) एप्रिल २०२६ पर्यंत आयोजन केले होते. त्तपुर्वी बुधवार (दि.२५) मार्च रोजी सायंकाळी श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून भव्य शोभायात्रा काढुन बैलगाडीवर मनमोहक, श्री राम सिता , लक्ष्मण यांची सजीव झाकी , पादुका पालखी , सोबत राम सरोवर अखाडा , हनुमान झाकी , रामरथ , डी जे , बँड व महिला भजन मंडळा सोबत मनमोहक शिव तांडव नुत्य, महाकाल रुपाने लोकांना आकर्षित करून उपस्थित जन समुहाला मंत्रमुग्ध केले .
गुरूवार (दि.२६) मार्च रोजी सकाळी पासुन रोज २४ × ७ च्या स्वरुपात सतत सात दिवस भजनी मंडळांचा पहारा भजनाने अखंड हरिनाम सप्ताहाने परिसर भक्तीमय करण्यात आला . हुड मोहल्ला भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय मॉ दुर्गा भजन मंडळ, श्री मारोती नंदन भजन मंडळ, आरती गन भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ आदिनी अखंड भजनाने पहारा दिला. गुरूवार (दि.२) एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दही लस्सी वितरण करून दुपारी १ वाजता हजारो श्रीराम व श्री हनुमान भक्तांच्या उपस्थित भव्य महाआरती करुन मान्यवराच्या हस्ते दंहीहंडी फोडुन दहिकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात आला . सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजे पर्यंत उपस्थित भाविकांनी पंगती मध्ये बसवुन भव्य महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री हनुमान मंदीर देवस्थान कमे टी टेकाडी चे पंढरी बाळबुधे, गोपिनाथ गुरधे, मनोज लेकुरवाळे, बंडु इंगळे, जयदेव सातपैसे, नागोराव गोरले, मोतिराम सातपैसे, देवेंद्रसिंग सेंगर, सुर्यभान कुंभलकर, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, बहु संख्य युवक सह समस्थ टेकाडी ग्रामस्थानी परिश्रम घेत सहकार्य केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या