विजय वासाडे यांचा १२ एप्रिल रोजी होणार पुणे येथे सन्मान
कन्हान : - नागपुर जिल्हयातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पासुन जवळच असलेल्या टेकाडी (को. ख) गावातील प्रसिध्द कवी , युवा गझलकार विजय वासाडे याना बंधुता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने विश्वबंधुता साहित्य संमेलन पुणे येथे प्रदान करून सन्माणित करण्यात येणार आहे .
विश्वबंधुता साहित्य परिषद पुणेचे पुरस्कार जाहीर यावर्षीचा बंधुता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार नागपुरचे प्रसिद्ध कवी , युवा गझलकार विजय माणिकराव वासाडे यांना २८ व्या विश्व बंधुता साहित्य संमेलन पुणे येथे रविवार दि.१२ एप्रिल रोजी संमेलनाचे उदघाटक प्रा.सुभाष वारे , बंधुता साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे , संस्थापक प्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा वानखेडे , सिमा झिंजुरके , कवि संमेलनाध्यक्ष विनोद सावंत आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहें . तसेच वासाडेच्या सोबत कवी सुशील सातपुते यांना विषबंधुता लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार तर गोपाळ कांबळे यांना पदमश्री नामदेव ढसाळ सा हित्य पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहें . पुरस्कार वितरण सोहळा तसेच निमंत्रित कवी संमेलन पार पडणार आहे .
Vijay Vasade to be honored in Pune on April 12.
साहित्य क्षेत्रातील अभुतपुर्व अशा दखलपात्र वाटचालीबद्दल विजय वासाडे यांचे समाजातील सर्व स्थरातुन कौतुक होतं आहें . याप्रसंगी जेष्ठ समिक्षक प्रभाकर तांडेकर , अक्षरक्रांतीचे अध्यक्ष शंकर घोरसे , कवी राजेश माहुरकर , चारोळीमंचचे तुकाराम कांबळे , विनायक चिखलीकर , उदय नेवे , हितेश गोमासे , राहुल गवस , लीलाधर दवंडे , भगवान पाटील , शीतल बोढे आदींनी विजय वासाडे यांचे अभिनंदन केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या