धारधार शस्त्राने तरुणाचा निर्घुन खुन
रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुधाळा गावाजवळ पैशाच्या वादातुन एक तरुणाची गुरुवार दिनांक 15 मे च्या रात्री अंदाजे 11 ते 12 वाजताच्या दरम्यान धारधार शस्त्राने हत्त्या करण्यात आली .
प्राप्त माहिती नुसार रामटेक जवळचा कवडक दुधाळा, शांतीनाथ मंदिर जवळ राहणारा तरुण हर्षल धनराज कोटांगले याचा गावातच राहाणाऱ्या स्वप्नील इंगोले या तरुणा सोबत पैशाचा वाद सुरु होता .
गुरुवारी रात्री अंदाजे 11 ते 12 वाजताच्या दरम्यान दुधाळा रोड नगरपरीषद कॉटर जवळ दोघांचा ही पैशाचा वाद सुरू असतांना आरोपी स्वप्नील इंगोले याने त्याचा लहान भाऊ दुर्गेश इंगोले यास फोन करून बोलावून घेतले .
आरोपी दुर्गेश इंगोले याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने हर्षल कोटांगले याच्या छातीवर व पोटावर सपासप वार करून त्यास जख्मी केले .
हा प्राणघातक हल्ला घरापासुन काही मिटर अंतरावर झाला स्थानिकांनी जख्मी हर्षल कोटांगले यास प्रथम उपजिल्हा रुग्नालय रामटेक येथे भरती केले . परंतु प्रकृती नाजुक असल्याने त्यास नागपूर च्या मेयो रुग्नालयात हलविण्यात आले असता वाटेतच त्याचा करुण अंत झाला .
रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आसाराम शेटे यांनी अवघ्या काही तासातच आरोपी स्वप्नील इंगोले व त्याचा लहान भाऊ आरोपी दुर्गेश इंगोले यास अटक केली आहे .
Brutal murder of a young boy with a sharp weapon
गावात शोककळा पसरली असुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे
पुढाकार 24 न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम
0 टिप्पण्या