Advertisement

भजन कीर्तन , प्रसाद , शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी


भजन कीर्तन , प्रसाद , शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी


"जय श्री राम, जय जय श्री राम" च्या जयघोषाने कन्हान परिसर दुमदुमले . 


कन्हान : - सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.



गुरुवार (दि.२६) मार्च रोजी श्रीराम नवमी च्या दिवशी शिवपंचायत हनुमान मंदिर गांधी चौक येथे राम, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमेचे युवा समाजिक कार्यकर्ता शुभम बावनकर , ऋषभ बावनकर यांच्या हस्ते जलाभिषेक , विधिवत पूजा अर्चना , हवन पुजा  करण्यात आली आणि दुपारी माऊली भजन मंडळ रायनगर , स्वामी विवेकानंद नगर यांचे भजन कीर्तन करुन श्रीराम नवमी महोत्सवाचा थाटत शुभारंभ करण्यात आला . शुक्रवार (दि.२७) मार्च रोजी सकाळी हनुमान चालीसा पठन , महाआरती करण्यात आली . दुपारी नवदुर्गा भजन मंडळ कांद्री यांचे भजन कीर्तन करण्यात आले आणि सायंकाळी महाप्रसाद वितरण करण्यात आला . शनिवार (दि.२८) मार्च ला दुपारी विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ शिवाजी नगर कन्हान यांचे भजन कीर्तन करण्यात आले व सायंकाळी महाआरती करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली . यात्रेत डीजे , राम दरबार , रामाचा रथ , घोडे आकर्षणाचे बिंदु ठरले . यात्रे दरम्यान शिवशंभु आखाडाच्या तरुणांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन भाविकांना मन मोहित केले . रामच्या वेशभुषेत तन्मय चरडे , सीताच्या वेशभुषेत वैष्णवी किरपाने , लक्ष्मणच्या वेशभुषेत अंश कोलते , हनुमान च्या वेशभुषेत तेजस बावनकुळे प्रामुख्याने सहभागी झाले होते . 

The three-day Shri Ram Navami festival was celebrated with great enthusiasm, featuring *bhajans*, *kirtans*, *prasad* distribution, and a ceremonial procession.

शोभायात्रा शिवपंचायत हनुमान मंदिर येथुन काढुन महामार्गने आंबेडकर चौक , तारसा चौक , ७ नंबर नाका , संताजी नगर चौक होत परत महामार्गा ने हनुमान मंदिर गांधी चौक येथे यात्रेचे समापन करण्यात आले . यावेळी भाविक भक्तांनी "जय श्री राम, जय जय श्री राम" च्या जयघोष केल्याने संपुर्ण कन्हान परिसर दुमदुमुन गेले होते व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते . याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिये , कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , गटनेता मनोज कुरडकर , नगरसेविका सुचिता माटे , सरपंच सुनिल जामदार , लोकेश दमाहे , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , अशोक पाटील , गजराज देविया , बालकिशन गुप्ता , जीवन मुंगले , संदीप कुकडे , आशिष इंगोले , विनोद केने , संजय सत्यकार , विनोद यादव , मनोहर कोल्हे , चंद्रशेखर बावनकुळे , निखिल तांडेकर , नरेश आरबी , विक्की सोलंकी , मोहनसिंग यादव , नंदलाल यादव , राजेश बोपुलकर , अश्विन कांबळे , चंद्रभान मंगर , शंकर सराेदे , कांचनमाला माकडे , सरला बावनकर , सुषमा मस्के , रंजना किरपाने , अर्चना तांडेकर , मीना कळंबे, ममता मेश्राम , चंदा बावनकर , लता बावनकुळे , श्रुती किरपाने , मीना गिऱ्हे , पारबता लंगडे , सुरेखा नागपुरे , शोभाबाई मंगर , वडेबाई , गिताबाई भिलकर , मिराबाई तिडके , शारदा भंडारे , तनुजा वानखेडे , भारती महल्ले सह भाविक भक्त बहु संख्येने उपस्थित होते .



कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर , आयुष संतापे , ऋषभ बावनकर , हिमांशु सावरकर , सुजल यादव , शिव यादव , ओम यादव , उदय माहुरे , वेदांत बावनकुळे , अमन यादव , प्रथमेश कोल्हे , सुर्या संतापे , शुभम संतापे , आर्यन संतापे आदि सह सदस्यांनी परिश्रम घेतले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या