Advertisement

कन्हान मध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा


कन्हान मध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा


स्वच्छता अभियान , शोभायात्रा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन थाटात संपन्न 


कन्हान : -  कन्हान - पिपरी शहरात बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान - पिपरी द्वारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जन्मोत्सव स्वच्छता अभियान राबवुन , शोभायात्रा सह विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

The birth anniversary of the Great Renunciate Baba Jumdevji was celebrated with great enthusiasm in Kanhan.

बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान पिपरी द्वारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . शुक्रवार (दि.३) एप्रिल  रोजी बाबा जुमदेव यांचा जयंती च्या दिवशी बाबा हनुमानजी सेवक संस्था कार्यालय येथे कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.लता बुराडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.य.म. ढबाले गुरुजी , विशेष अतिथि देवचंद सेलोकर , युवराज गलबले , राकेश लिल्हारे , रोहित शेंडे , भगवान पिल्लारे , रामनरेश बोंदरे , सहादेव लुटे , अशोक बोंदरे , हितेश ढोबळे , विजय निमकर , सौ.शालु निबार्ते , लक्षमण माहुले सह आदि मान्यवरांचा हस्ते महानत्यागी बाबा जुमदेव यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करीत बाबा जुमदेब ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमाने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . बाबा हनुमानजी सेवक संस्था कार्यालय पटेल नगर ते गांधी चौक आणि प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले .


 दुसऱ्या दिवशी शनिवार (दि.४) एप्रिल रोजी संस्था कार्यालयात बाबा जुमदेव यांचा प्रतिमेचे पुजन करून सामुहिक हवन करण्यात आले . तसेच संस्था कार्यालय पटेल नगर येथून बाबा जुमदेव यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली . ही शोभायात्रा राष्ट्रीय महामार्गा ने गांधी चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका होऊन परत तारसा चौक , आंबेडकर चौक ,  अशोक नगर , धरम नगर, दुर्गा मंदिर चौक पिपरी होत शोभायात्रे चे संस्था कार्यालय पटेल नगर येथे समापन करण्यात आले . यावेळी महामार्गा वर छोटु राणे व श्यामजी पुंडकर मित्र परिवार सह ठिकठिकाणी शोभायात्रेचे नागरिकांनी फुलाच्या वर्षाने, फळ , नमकीन शरबत वितरण करुन जोरदार स्वागत केले . संस्था कार्यालयात महानत्यागी बाबा जुमदेवजींचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .भगवत कार्याची चर्चा बैठक आणि स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे अध्यक्ष प्रमोद घुले , कार्याध्यक्ष सौ.चंद्रकलाबाई देशमुख , उपाध्यक्ष संजय भैस , सचिव दिनेश देशमुख , सहसचिव मानिक पोटे , कोषाध्यक्ष शांतनु राऊत , सागर फुले , मोरेश्वर भोयर , धिरज देवांगन , गजानन राहाटे , नरेश पाल , अनिल केवट , नितीन चनेकार , अंकुश भोयर , हिमांशु भोयर , प्रज्वल वरणकर , गिताताई सहारे , कविताताई हावरे यांच्यासह आदि सेवक - सेविका व बालगोपाल - बालसेविका आदिंनी परिश्रम घेतले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या