Advertisement

महाकाली मंदीर सत्रापुर-कन्हान व्दारे घट विसर्जन करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात संपन्न


महाकाली मंदीर सत्रापुर-कन्हान व्दारे घट विसर्जन करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात संपन्न


कन्हान : - जय महाकाली सेवा समिती सत्रापुर (कन्हान) ता. पारशिवनी , जि.नागपुर व्दारे कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक , प्राचिन महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे घटस्थापना करीत नऊ दिवस पुजा अर्चना , भजन कीर्तन , विविध धार्मिक कार्यक्रम करुन  कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन आणि महाप्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात आला.

 

"सर्व दुःख हरून मनोकामना पूर्ण करणारी आई जय महाकाली"


कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक रेल्वे पुलाची साक्ष देणारे आणि बंगालच्या कारागिरांना साक्षात दर्शन देणाऱ्या सत्रापुरचे जय महाकाली मंदिर हे एक प्राचिन अत्यंत जागृत देवस्थान आहे . या देवीच्या दरबारात दर वर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पंचमी सोमवार (दि.२३) मार्च रोजी सकाळी १० वाजता जय महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे विधीवत घट स्थापना करून चैत्र नवरात्र उत्सवाची सुरूवात करण्यात आली . नऊ दिवस सकाळ , सायंकाळी पुजा , आरती व जस , भजन गायनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . मंगळवार (दि.३१) मार्च रोजी सकाळी १० वाजता मा.सनदजी गुप्ता यांचे हस्ते विधिवत पुजा अर्चना करून वाजा गाज्यासह कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन केल्यावर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला . 


आई महाकालीच्या प्रत्यक्ष साक्षात्काराने पुण्य झालेल्या या पावन भूमीत विदर्भ , नागपुर जिल्हयासह मध्यप्रदेश येथील दुर दरून भाविकांनी येऊन नतमस्तक होऊन आई महाकालीच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन सफल केले . नवरात्रौत्सवाच्या यशस्विते करिता जय महाकाली सेवा समिती , सत्रापुर (कन्हान) चे भक्त उत्तमराव दुरूगकर महारा ज , सचिव प्रकाश कडु , अर्जुन पात्रे , शरद डोणेकर , कैलास भिवगडे , उषा पात्रे , जेष्ट नागरिक संघ कन्हान सह परिसरातील भाविकांनी सहकार्य केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या