वराडा गावात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा थाटात
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात माऊली हरिपाठ भजन मंडळ आणि हनुमान मंदिर पंचकमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
गुरुवार (दि.२६) मार्च रोजी ह.भ.प बाळकृष्ण घोडमारे यांच्या हस्ते श्री हनुमंतरायाचा अभिषेक , कलश स्थापना , दिप प्रज्वलन , विधिवत पूजा अर्चना आरती सह गावात भव्य पालखी शोभायात्रा काढुन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . दररोज सायंकाळी गुरुदेव भजन मंडळ , शिवगौरी भजन मंडळ , शारदा महिला भजन मंडळ , बालगणेश भजन मंडळ , शिव भजन मंडळ यांचे भजन कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले . रविवार (दि.२९) मार्च रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता पर्यंत ह.भ.प निंबाजी तागड महाराज यांचे संतीतमय भाऊड कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले . मंगळवार (दि.३१) मार्च रोजी सायंकाळी ७ ते ११ वाजता पर्यंत ह.भ.प महेश पुरी यांचे कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले . शुक्रवार (दि.३) एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ वाजता पर्यंत ह.भ.प संतोष निंबाळकर महाराज यांच्या हस्ते गोपाल काल्याचे किर्तन करुन दहीहंडी फोडुन दहिकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात आला . सायंकाळी महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
The Akhand Harinam Saptah and the Grand Recitation Ceremony of the *Grantharaj Dnyaneshwari* were celebrated with great pomp in the village of Varada.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ह.भ.प. बबनराव भिलकर , सरपंच सुनिल जामदार , पोलीस पाटील संजय नेवारे , अमोल देऊळकर , कैलास पुंड , ईश्वर घोडमारे , पियुष हेटे , राहुल खोब्रागडे , शंतनु वानखेडे , स्वप्नील अवसरे , प्रफुल देऊळकर , कृष्ण खेडेकर , शुभम नागमोते , शुभम पुंड , दुर्गेश घोडमारे , रोशन जामदार , चैतन्य जामदार , मयुर घोडमारे , योगेश जामदार , रौनक घोडमारे सह आदि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या