Advertisement

कन्हान , कांद्री परिसरात श्री हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा


कन्हान , कांद्री परिसरात श्री हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा


मंदिर समिती अध्यक्ष नारद दारोडे यांचा वाढदिवस ही उत्साहात साजरा. 


कन्हान : - कन्हान , कांद्री सह ग्रामीण भागात श्री हनुमान जन्मोत्सव श्री हनुमान मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाने " जय श्री राम , जय श्री हनुमान " च्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .


राय नगर कन्हान येथे दोन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव

Shri Hanuman Janmotsav was celebrated with great enthusiasm and various programs in the Kanhan and Kandri areas.

श्री हनुमान मंदिर जे.एन.रोड राय नगर कन्हान येथे अखंड रामायण पाठ , भजन आणि महाप्रसादा सह दोन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला . 



बुधवार (दि.०१) एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव निमित्य २४ तास अखंड रामायण पाठ करून गुरूवार (दि.२) एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आरती नंतर प्रसाद वितरण करण्यात आला . सायंकाळी ६ वाजता पासुन भजन आणि भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आला .  परिसरातील मोठया प्रमाणात हनुमान भक्तांनी महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री हनुमान मंदीर पंच कमेटी राय नगर कन्हान चे विनायक हिवसे , राजेश हूड , पवन माने , सुभास यादव , नरेश डोंगरे , गजानन हूड , प्रविन माने , पिंटु गुप्ता , गजानन कुंभलकर , नमिश झाडे सह समस्थ राय नगर वासीयांनी सहकार्य केले . 


 इंदिरा नगर येथे भव्य महाप्रसादाने हनुमान जयंती   


श्री हुनमान मंदीर समिती इंदिरा नगर कन्हान व्दारे श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभाव , श्रद्धा आणि विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली . “जय श्री हनुमान” च्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता . श्री हनुमान मंदीर इंदिरा नगर कन्हान येथे सकाळी पूजा - अर्चना , महाआरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले . भजन - कीर्तनाच्या कार्यक्रमांमुळे संपुर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता . सायंकाळी ७ वाजता पासुन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , मंदिर समिती अध्यक्ष नारद दारोडे , काँग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे , समाजसेवक ज्ञानेश्वर दारोडे , माजी नगरसेवक गेंदलाल काठोके , राजु काठोके , आनंद कावळे , सचिन घोडमारे , नगरसेवक विनोद किरपान , प्रमोद बावनकुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली . बहुसंख्येने भाविकांनी मंदिरात उपस्थित राहुन श्री हनुमानाच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला .  या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मंदिर समिती अध्यक्ष नारद दारोडे यांचा वाढदिवस मंदिर परिसरातच साजरा करण्यात आला . उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता इंदिरा नगर येथिल नागरिक व मंदिर समितीने परिश्रम घेतले . या धार्मिक सोहळ्याने सामाजिक एकात्मता आणि श्रद्धेचा सुंदर संगम घडवुन आणला .


  श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री- कन्हान


श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री - कन्हान येथे हनुमान जन्मोत्सव निमित्य (दि.३१) मार्च २०२६ रोजी रात्री ८ ते १०.३० पर्यंत ह.भ.प.श्री.निंबाजी तागड महाराज (वासीम) यांचे संगीतमय भारुड किर्तन कार्यक्रम  पार पडले . प्रमुख अतिथी म्हणून कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे व महीला बघिनी मंडळ कांद्री , नगरपंचायत कांद्री नगराध्यक्ष सुजित पानतावणे , उपनगराध्यक्ष धर्मेंद्र सरोदे व नगरसेवक आणि नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते .


 शुक्रवार (दि.२) एप्रिल रोजी पहाटे ५ वा. विधीवत अभिषेक पूजा पाठ करून आरती करण्यात आली . सकाळी ९.३० पासून १२.३० पर्यंत  संत गजानन भजन मंडळ कांद्री यांचा हरी भजनाचा कार्यक्रम पार पाडला . गोपाल काला कार्यक्रम मा.सचिन गाढवे मुख्याधिकारी कांद्री व कवडु आकरे जेष्ठ नागरिक यांचें हस्ते करून आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आले . प्रमुख पाहुणे मंडळींना शाल , श्रीफळ देऊन सम्मानित करण्यात आला . दुपारी ३ वाजता श्रीराममानस महिला भजन मंडळ कांद्री यांचे सुंदर कांड होऊन सायंकाळी ७ वाजता भव्य महाप्रसाद छोटु सिंग व राहुल सिंग यांचे उपस्थित वितरण सुरू करण्यात आले .


 कार्यक्रमात नगराध्यक्ष सुजित पानतावणे , उपनगराध्यक्ष बंटी सरोदे , नगरसेवक शिवशंकर चकोले , हरिश्चंद्र ठाकरे , महादेव किरपान , झिबल सरोदे , राजेश पोटभरे , वासुदेव आकरे , प्रकाश चापले , महेंद्र बाबु पलिये , रमेश पोटभरे , हेमा आंबाळकर , प्रविण हिंगे , सचिन किरपान , सेवक भोंडे , उमेश वाडीभस्मे , दिनेश खाडे , अतुल हजारे , राजु सरोदे , गणेश भक्ते , विष्णु सरोदे , सुनिल प्रजापती , देवांश दिक्षित , धनराज क्षिरसागर सह गावकरी मंडळी महाप्रसादाचा लाभ घेतला .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या