Advertisement

आदिवासी बांधवांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपली सर्वांगीण प्रगती करावी- छाया कुरुटकर


आदिवासी बांधवांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपली सर्वांगीण प्रगती करावी- छाया कुरुटकर 


आदिवासी बांधवाना कपडे व विविध वस्तुचे वाटप.


कन्हान : - योग सखी बहुउद्देशीय संस्था व सुजाण सामाजिक बहुउद्देशीय विकास मंच नागपुर व्दारे गाव - कोहाना तालुका . परतवाडा . जिल्हा. अमरावती येथे आदिवासी बंधु भगिनींना कपडे व विविध वस्तुचे वाटप मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .


कोहाना गाव हे धारणी रोडवर असुन निसर्गाच्या कुशीत वसलेल आहे . सर्वप्रथम समाज मंदिर येथे गावकरी मंडळींना आमंत्रित करून तेथील प्रमुख श्री बाजीलाल , प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खरपास वाजिद भाई तसेच आदिवासी महिलांचा व पुरुषांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या सचिव व सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुरुटकर यांनी प्रबोधन करताना सांगितले की आदिवासी मुला - मुलींनी शिक्षण घेणे फार गरजेचे आहे . आपण शिक्षित झाल्यास आपला सर्वांगीण विकास होईल तसेच गावाचा सुद्धा विकास होईल .

Our tribal brethren should join the mainstream of education and achieve their holistic development.

सुजाण सामाजिक बहुउद्देशीय विकास मंचचे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे व सचिव राजेश हाडके यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाचे व संविधानाचे महत्त्व पटवुन दिले . प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खरपास यांनी आरोग्य विषय माहिती दिली . या प्रसंगी मदन नागपुरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले . राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रांतिय महासचिव शरद वानखेडे यांनी सूत्रसंचालन व सामाजिक प्रबोधन केले .


कोहाना येथील अंगणवाडीच्या प्रांगणात आदिवासी भगिनींना साड्या , सलवार सूट , वनपीस व गृहपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले . बांधवांना शर्ट ,पॅन्ट , जॅकेट , कोट आदीचे वाटप करण्यात आले . लहान मुला , मुलींना पाणी बॉटल , शर्ट , पॅन्ट , जीन्स पॅन्ट इत्यादीचे वाटप सह उपस्थित सर्व मुला , मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले . खेळी मेळीच्या वातावरणात छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला . 


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता योग सखी व सुजाणचे पदाधिकारी छाया वानखेडे , मेघा फेंडर , माधुरी लाडेकर , श्वेता खाइवले , सुनंदा मोकासरे , रेखा कन्नाके , मनिषा बोरकर , विद्या लडके , कांचन राऊत , प्रियंका साठवणे , पुष्पा बनकर , योगिता कारेमोरे , निशा हटकर , संगिता नागपुरे , प्रतिभा वाणी , मीरा मदनकर , प्रविण बालपांडे , कैलास कुरुटकर , उमाकांत राऊत , नारायण लडके , निषाद कुरूटकर , आदित्य वानखेडे , मोनु राऊत आदींनी परिश्रम घेतले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या