Advertisement

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत नुपूर बजाईतचा झंकार ; प्रथम क्रमांक पटकावला


आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत नुपूर बजाईतचा झंकार ; प्रथम क्रमांक पटकावला


नागपुर : - वाडी येथील कु. नुपूर अनिल बजाईत हिने आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावून वाडी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे . तिच्या या यशामुळे वाडी परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


दि. ११ एप्रिल २०२६ रोजी एस. एफ. कॉलेज, सेमिनरी हिल, नागपूर येथे ‘नोवा स्टेलर’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत नागपूरमधील नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेत कु. नुपूर बजाईत हिने आपल्या दमदार आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाने परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांकावर झेप घेतली . कु. नुपूर ही एस. एफ. कॉलेजमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून तिने यापूर्वीही हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपली कला सिद्ध केली आहे . 

तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव , जिद्द आणि कष्ट यांचे मोठे योगदान असल्याचे तिचे वडील श्री.अनिल बजाईत व आई सौ. वैशाली बजाईत यांनी सांगितले . नुपूरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वाडीतील श्री. मोतीराम शहारे , श्री. रोशन वैद्य, श्री. उमेश साहू, दीपक अवचट, अनिल दहाघाणे, श्री. अविनाश टाके, श्री. रामेश्वर वाडीमस्मे, प्रीती चौधरी, देवा क्षिरसागर, संजय जीवनकर आदी मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या