Advertisement

टेकाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव थाटात


टेकाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव थाटात


कन्हान : - अखिल भारतीय माळी महासंघ तालुका पारशिवनी,जिल्हा नागपुर व्दारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव अत्यंत उत्साहपुर्ण व प्रेरणादायी वातावरणात थाटात संपन्न झाली.  

Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary Celebration Held with Great Pomp at Tekadi

शनिवार (दि.११) एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अखिल भारतीय माळी महासंघ तालुका पारशिवनी,जि. नागपुर व्दारे श्रीकृष्ण मंदिर परिसर टेकाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे मा.रविंद्र गणोरकर यांच्या अध्यक्षेत तर ॲड.राजेंद्र महाडोळे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ , महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले . 

यावेळी प्रमुख अतिथी मा.मनोज गणोरकर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ नागपुर , तर प्रमुख पाहुणे मा.वसंतराव गाडगे अध्यक्ष , प्रागतिक अध्यापक शिक्षण संस्था , नागपुर , डॉ. प्रा. मनोज होले यांच्या उपस्थित महोत्सवाची सुरूवात करण्यात आली . मार्गदर्शन करतांना ॲड.राजेंद्र महाडोळे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा गौरव करित समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केले . त्या काळात शिक्षणापासुन वंचित सर्व समाज घटकांना शिक्षणाची दारे खुली करून दिली . शेतकऱ्यांवर होणारा अन्याय , स्त्रियांची दयनीय स्थिती आणि सामाजिक विषमता विरुद्ध त्यांनी ठाम पणे आवाज उठविला . 

सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अंधश्रद्धा , कुप्रथा , सतीप्रथा , विधवां वरील अन्याय यांना विरोध करत समाज सुधारण्याचे महान कार्य केले . त्यांनी पुढे संबोधित केले की , आज ही माळी समाज विविध पोटजातींमध्ये विभागलेला असल्यामुळे एकसंघ शक्ती निर्माण होत नाही . समाजाला संघटित करण्यास गावागावांत प्रबोधन शिबिरे आयोजित केली जात आहेत . युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे , उद्योजकता वाढविणे, महिलांना स्वावलंबी बनविणे , विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व शिष्यवृत्ती मिळवुन देणे हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे . 

संपुर्ण महाराष्ट्रात संघटन बळकट करण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .  यावेळी डॉ. प्रा. मनोज होले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले . प्रा.वसंतराव गाडगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचा सखोल आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले . जिल्हाध्यक्ष मनोज गणोरकर यांनी समाज बांधवांनी संघटित होऊन प्रत्येक गावात संघटनेच्या शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले .


या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे प्रसारण करणे , त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि समाजात जागृती निर्माण करणे हे होते . या कार्यक्रमास टेकाडी , गोंडेगाव , वराडा , कांद्री , डोरली , अरोली तसेच परिसरातील इतर गावांतील समाजबांधव , युवक , महिला व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला . पारशिवनी तालुका परिसरात अशा स्वरूपाचा माळी समाजाचा भव्य कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसुन आला . 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज मोहाडे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर वासाडे यांनी केले . अखिल भारतीय माळी महासंघ, तालुका पारशिवनीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या