धर्मराज ला शिक्षणाधिकारी योजना यांची भेट
निरक्षर साक्षरता अभियान अंतर्गत परीक्षा , साहेब म्हणयं... शिका ना अ आ ई....
कन्हान : - चेहर्यावर सुरकुत्या.... अन.... थरथरत्या हातात पेन अन कागद काहिसे असेच चित्र.... आज साक्षरता परिक्षा वर्गातील प्रवेश करतांना दिसले..... साहेब म्हणयं.... शिका ना अ आ ई.......
कन्हान - कांद्री परिसरातील धर्मराज प्राथमिक शाळा व धर्मराज विद्यालय कांद्री - कन्हान येथे रविवार (दि.२९) मार्च रोजी शिक्षणाधिकारी (योजना) मा.आशिष चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने साक्षरता परीक्षा वर्गाची पाहणी केली . २०२७ पर्यंत संपुर्ण साक्षरतेचा टप्पा गाठायचा आहे . त्या अनुषंगाने गावागावात शिक्षकांकडे निरक्षर व्यक्तींना कमाल ज्ञान देउन साक्षर करायचे आहे . धर्मराज प्राथमिक शाळा येथे ८ तर धर्मराज विद्यालय येथे १० असाक्षरांची नोंद आहे . या सर्व विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती . या साक्षर वर्ग परीक्षेत १८ असाक्षर विद्यार्थी उपस्थित होते . शिक्षणाधिकारी (योजना) मा.आशिष चव्हाण, सहाय्यक योजना अधिकारी नितीन वाघमारे , साधन व्यक्ती नितीन कवडे , प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये , माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश डुकरे यांनी उपस्थित असाक्षर परीक्षा वर्गाची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला . प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे असे सांगत संपुर्ण शिक्षित भारत निर्माण करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) मा. आशिष चव्हाण यांनी केले . मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी असाक्षर वर्ग , नियोजन या संदर्भातील माहिती दिली .
Dharmaraj meets with the Education Officer.
यावेळी असाक्षर परिक्षेचे कामकाज पाहणारे उपमुख्याध्यापक मोहन भेलकर , पर्यवेक्षक राजु सिंग राठोड , चित्रलेखा धानफोले , गणेश खोब्रागडे , भिमराव शिंदेमेश्राम , गंगराज यांच्यासह इतर शिक्षकवृंद उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या